शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

By यदू जोशी | Updated: April 23, 2025 09:09 IST

आजी-माजी आमदार, खासदारांना भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी नाही, महिला, अनुसूचित जाती, जमातीचे किमान २० टक्के जिल्हाध्यक्ष असतीलच

यदु जोशी मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांना वेग आला असताना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंगळवारी बॉम्ब टाकला. आजी, माजी आमदार, खासदार यापैकी कोणीही जिल्हाध्यक्ष होणार नाही, किमान २० टक्के अध्यक्ष महिला, अनुसूचित जाती जमातीचे असतील असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मंगळवारी रात्री भाजपचे प्रदेश पदाधिकारी, पक्षाचे आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक यांची मुंबईत बैठक घेतली. त्यात त्यांनी हे निर्देश दिले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. संघटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्रात ७८ जिल्हे आहेत. त्यापैकी किमान २० टक्के म्हणजे किमान १५ जिल्हाध्यक्ष हे महिला, अनुसूचित जाती वा अनुसूचित जमातींचेच असतील है. कटाक्षाने पाळा, हा आकडा ३० टक्क्यांपर्यंतही गेला तरी हरकत नाही, असे शिवप्रकाश यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी जे निरीक्षक नेमले आहेत ते त्या त्या जिल्ह्यात जाऊन नेते, कार्यकर्ते यांना भेटतील. त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदासाठी पसंतीक्रम घेतील. ज्या तीन नावांना सर्वाधिक पसंती मिळाली त्यांची नावे निरिक्षकांकडून प्रदेशाध्यक्षांना ३० एप्रिलपर्यंत दिली जातील. ५ मे पर्यंत जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. निरीक्षक ज्या तीन जणांचे पॅनेल तयार करतील त्यात महिलांमधून एक आणि अनुसूचित जाती-जमातींतून एक नाव असलेच पाहिजे, असा नियम करण्यात आला आहे.

आताच आले अन् लगेच मिळाले असे होणार नाहीभाजपमध्ये दीर्घकाळ पक्षसंघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच जिल्हाध्यक्षपद दिले जाणार आहे.

जिल्हे वाढविण्याचा प्रस्ताव फेटाळलाभाजपचे संघटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्रात ७८ जिल्हे असूनही ही संख्या वाढविण्याची मागणी प्रदेश भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात आली होती. मात्र, ती फेटाळण्यात आल्याची माहिती आहे. सरकार, कार्यकर्ते, संघटना आणि पक्षाचा विचार या चारही घटकांना न्याय देण्याची क्षमता असेल अशीच व्यक्ती जिल्हाध्यक्ष व्हायला हवी, जिल्हाध्यक्षाचे वय हे ४५ ते ६० वर्षांच्या दरम्यानचे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :BJPभाजपा