प्रस्थापितांना हादरा, नव्या चेहऱ्यांचा शोध
By Admin | Updated: October 17, 2016 01:47 IST2016-10-17T01:47:44+5:302016-10-17T01:47:44+5:30
महापालिका २०१७च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

प्रस्थापितांना हादरा, नव्या चेहऱ्यांचा शोध
टीम लोकमत,
मुंबई- महापालिका २०१७च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नव्या प्रभागरचनेमुळे दिग्गजांची दांडी गुल झाली आहे. शहरातून उपनगरात स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमुळे शहरातील प्रभाग कमी होऊन उपनगरात प्रभागांचा भरणा अधिक झाला आहे. विशेषत: नव्या प्रभाग रचनेचा फटका विद्यमान नगरसेवकांना अधिक बसला आहे. वॉर्डातील अर्ध्या नगरसेवकांच्या स्वप्नावर आरक्षणामुळे पाणी फेरले जाणार आहे. एकंदर महापालिकेच्या निवडणुकीला दोनएक महिन्यांचाच कालावधी शिल्लक असतानाच आता प्रत्येक राजकीय पक्षातल्या दावेदारांसह उत्सुक असलेल्या उमेदवारांनी छुप्या खेळी खेळत पक्षश्रेष्ठींचा वरदहस्त मिळवण्यासह जनसंपर्कावर भर दिला आहे. असेच काहीसे भारावलेले आणि औत्सुक्याचे चित्र मुंबापुरीतल्या प्रत्येक वॉर्डातल्या प्रभागात रंगले आहे.
‘एल’ वॉर्डमध्ये एकूण १६ प्रभाग आहेत. या वॉर्डात गत महापालिका निवडणुकीत मनसेचे दिलीप लांडे, ईश्वर तायडे, शिवसेनेच्या कोमल जामसांडेकर, मनाली तुळसकर, संजना मुणगेकर, अनुराध पेडणेकर, दर्शना शिंदे, राष्ट्रवादीच्या सईदा खान, सविता पवार आणि अपक्ष म्हणून लीना शुक्ला, ललिता अन्नामलाई, विजय तांडेल अशा दिग्गज उमेदवारांनी विजय मिळवला होता. आता यापैकी अनेकांनी पक्षांतर केले आहे. काही पक्षांतराच्या मार्गावर आहेत. तर नव्या प्रभाग रचनेचा काहींना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या गतनिवडणुकीत भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होती. परिणामी, या युतीने अनेकांना धूळ चारली होती. मात्र विधानसभेला या दोन्ही युती तुटल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘एल’ वॉर्डातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या दावेदारांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.
>येत्या महापालिका निवडणुकीत एल वॉर्डमधील काही इच्छुक उमेदवार पक्षांतराच्या मार्गावर आहेत. तर नव्या प्रभाग रचनेचा काहींना मोठा फटका बसला आहे.
>गत महापालिकेच्या निवडणुकीत एल वॉर्डमध्ये शिवसेनेच्या पाच उमेदवारांनी बाजी मारली होती, तर खालोखाल सपाचे उमेदवार होते; शिवाय राष्ट्रवादीसह मनसेनेही येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
पाच वर्षांत येथे पक्षांतरासह विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. नव्या आणि जुन्यांमध्ये दरी पडण्यासह आपल्या अस्तित्वाची
लढाई सुरू झाली आहे.
प्रभाग क्रमांक १५६
एकूण लोकसंख्या ६०,६८५
अनुसूचित जाती ४,६७१
अनुसूचित जमाती १,०२५
प्रभागाची व्याप्ती : तुंगा व्हिलेज, उद्यान कॉम्प्लेक्स, सावरकरनगर, साकीविहार, लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनी
प्रभाग क्रमांक १५७
एकूण लोकसंख्या ५७,२३३
अनुसूचित जाती ४,९३८
अनुसूचित जमाती ३४९
प्रभागाची व्याप्ती : रहेजा विहार, म्हाडा कॉलनी, संघर्षनगर, बिग पार्क, चांदिवली स्टुडिओ, चांदिवली लेक
प्रभाग क्रमांक १५८
एकूण लोकसंख्या ५६,८७८
अनुसूचित जाती २,५८६
अनुसूचित जमाती ३४०
प्रभागाची व्याप्ती : यादवनगर, म्हाडा कॉलनी, टिळकनगर, म्हाडा मैदान
प्रभाग क्रमांक १५९
एकूण लोकसंख्या ५४,७३९
अनुसूचित जाती १,५५१
अनुसूचित जमाती २४४
प्रभागाची व्याप्ती : यादवनगर, असल्फा, मोहिली, सुभाषनगर, शिवप्रेमीनगर, आझादनगर
प्रभाग क्रमांक १६०
एकूण लोकसंख्या ५२,८०२
अनुसूचित जाती ३,४७७
अनुसूचित जमाती २१३
प्रभागाची व्याप्ती : मिलिंदनगर, भीमनगर, नारायणनगर, होमगार्ड ट्रेनिंग सेंटर
प्रभाग क्रमांक १६१
एकूण लोकसंख्या ५७,७४१
अनुसूचित जाती ३,0८२
अनुसूचित जमाती २१५
प्रभागाची व्याप्ती : लोकमान्य टिळकनगर, कृष्णनगर, वीर सावरकरनगर, नेताजीनगर, लाल बहादूर शास्त्री नगर
प्रभाग क्रमांक १६२
एकूण लोकसंख्या ५४,९८९
अनुसूचित जाती २,१५९
अनुसूचित जमाती ३२३
प्रभागाची व्याप्ती : शिवाजीनगर, साथी डिसोजानगर, स्पेंटा रेसिडेन्सी पार्क, एअरपोर्ट रनवे
प्रभाग क्रमांक १६३
एकूण लोकसंख्या ५४,३६५
अनुसूचित जाती ४,६४५
अनुसूचित जमाती १६५
प्रभागाची व्याप्ती : काजूपाडा, इंदिरानगर, परेरावाडी, मे. आर. इंडस्ट्रीयल एरिया, साकीनाका
प्रभाग क्रमांक १६४
एकूण लोकसंख्या ५७,३३0
अनुसूचित जाती ४,७४३
अनुसूचित जमाती २८१
प्रभागाची व्याप्ती : प्रीमिअर रेसिडन्सी, संजयनगर, अशोकनगर, कमानी, प्रीमिअर कॉलनी, नवपाडा
प्रभाग क्रमांक १६५
एकूण लोकसंख्या ५८,०४०
अनुसूचित जाती २,४४२
अनुसूचित जमाती २९३
प्रभागाची व्याप्ती : ख्रिश्चन गाव, जय अंबिकानगर, भारतीयानगर, हलावपूल, कोहिनूर रुग्णालय
प्रभाग क्रमांक १६६
एकूण लोकसंख्या ५६,६२१
अनुसूचित जाती ४,९६६
अनुसूचित जमाती ७९४
प्रभागाची व्याप्ती : क्रांतीनगर, संदेशनगर, वाडिया कॉलनी, किस्मतनगर, शांतीनगर, छत्रपती शिवाजी तलाव, बैलबाजार, कुर्ला बस डेपो
प्रभाग क्रमांक १६७
लोकसंख्या ५७,३२४
अनुसूचित जाती १,९८५
अनुसूचित जमाती ३१७
प्रभागाची व्याप्ती : विनोबा भावे नगर, बुद्ध कॉलनी, ब्राह्मणवाडी, कुर्ला ‘एल’ विभाग कार्यालय
प्रभाग क्रमांक १६८
एकूण लोकसंख्या ५५,७०७
अनुसूचित जाती ४,३७४
अनुसूचित जमाती २७६
प्रभागाची व्याप्ती : कल्पनानगर, टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्रनगर, कुर्ला मेट्रोपॉलिटेन कोर्ट, भाभा रुग्णालय
प्रभाग क्रमांक १६९
एकूण लोकसंख्या ५८,२६९
अनुसूचित जाती ७,६३७
अनुसूचित जमाती ४००
प्रभागाची व्याप्ती : नेहरूनगर, कामगारनगर, शिवशक्तीनगर, कुर्ला मदर डेअरी
प्रभाग क्रमांक १७०
एकूण लोकसंख्या ५३,५९८
अनुसूचित जाती २,२१८
अनुसूचित जमाती १९३
प्रभागाची व्याप्ती : कुरेशीनगर, तक्षशिलानगर, राहुलनगर, जी.टी.बी. नगर, एव्हाराडनगर, मराठी विज्ञान परिषद
प्रभाग क्रमांक १७१
एकूण लोकसंख्या ५२,७३१
अनुसूचित जाती ३,०५३
अनुसूचित जमाती २०१
प्रभागाची व्याप्ती : म्हाडा कॉलनी, प्रेमनगर, ताडवाडी, चुनाभट्टी म्युनिसिपल रुग्णालय
>२०१२मधील एल वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारांची माहिती
वॉर्ड क्र. विजयी उमेदवारप्राप्त मते पराभूत उमेदवार प्राप्त मते
१५0सविता पवार (एनसीपी)१०,०५८ अश्विनी माटेकर (मनसे) ६०१४
१५१ईश्वर तायडे (मनसे)८,८३४ चित्रा सांगळे (शिवसेना) ८२४९
१५२कोमल जामसांडेकर (शिवसेना)५,२८६ उषा मोरे (अपक्ष) ३,९७६
१५३लीना शुक्ला (अपक्ष)५६,३३२ लक्ष्मीबेन भानुशाली (मनसे)३,८८९
१५४दिलीप लांडे (मनसे)११,१४७ गणेश चव्हाण (काँग्रेस) ३,७९५
१५५ललिता अन्नामल्लई (अपक्ष)९,९०७ युसूफ खान (काँग्रेस) ४,१२०
१५६मोहम्मद अली शेख (समाजवादी)८,४८४ हरिश बंदिर्गे (बीजेपी) ६,०९१
१५७मनाली तुळसकर (शिवसेना)९,८५६ जेने ज्युलियस (काँग्रेस) ७,५६१
१५८दिलशाद आझमी (समाजवादी)५,३५३ अन्सारी मसुद (काँग्रेस) ५,२९१
१५९अश्रफ आझमी (समाजवादी)९,६२१ नितेश सिंह (काँग्रेस) ३,९८१
१६0संजना मुणगेकर (शिवसेना)११,२७६ सुनीता पवार (एनसीपी) ५,०२७
१६१सईदा खान (एनसीपी)६,७३० मीनल तुर्डे (मनसे) ३,७११
१६२अनुराधा पेडणेकर (शिवसेना)७,६६२ शेख तबस्सुम (समाजवादी)६,०८२
१६३दर्शना शिंदे (शिवसेना)५,५८३ पूर्णिमा केणी (मनसे) ४,८८६
१६४विजय तांडेल (अपक्ष)५,६१४ अब्दुल रशिद मलिक (एनसीपी)५,४४७
>युतीबाबत अद्यापही संभ्रम असला तरी दावेदारांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या प्रभाग रचनेने दिग्ग्जांना धूळ चारली असून, आपला प्रभाग हातातून निसटून गेलेल्यांनी हाती पडलेल्या प्रभागात अस्तित्वासाठी लढाई सुरू केली आहे.