सांस्कृतिक क्षेत्रत एकच भाई म्हणजे ‘पु.ल.’
By Admin | Updated: November 9, 2014 00:51 IST2014-11-09T00:51:24+5:302014-11-09T00:51:24+5:30
महाराष्ट्रात स्वयंघोषित भाई खूप आहेत, पण सांस्कृतिक क्षेत्रत एकच भाई म्हणजे ‘पु.ल.’ म्हणून एकच आहेत. साहित्य, नाटय़, संगीत अशा सर्वच क्षेत्रंत पु.लं.नी मुशाफिरी केली आहे.

सांस्कृतिक क्षेत्रत एकच भाई म्हणजे ‘पु.ल.’
मुंबई : महाराष्ट्रात स्वयंघोषित भाई खूप आहेत, पण सांस्कृतिक क्षेत्रत एकच भाई म्हणजे ‘पु.ल.’ म्हणून एकच आहेत. साहित्य, नाटय़, संगीत अशा सर्वच क्षेत्रंत पु.लं.नी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या सर्वच कलाकृती दज्रेदार आहेत, त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रत पु.ल. हे ‘भाई’ असल्याची भावना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या वतीने 8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ‘पु. ल. युवा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कुलकर्णी बोलत होते. याप्रसंगी शाहीर मधू खामकर, अॅड. समृद्धी पोरे, लोककलाकार नंदेश उमप, गायक मंगेश बोरगावकर, संगीतकार नीलेश मोहरीर, रंगभूषाकार कृष्णा बोरकर आणि संचालक आशुतोष घोरपडे उपस्थित होते. या वेळी पु.ल. यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून महोत्सवाच्या प्रतिमेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी पु.ल. आज आमच्यात नाहीत, डॉ. प्रकाश बाबा आमटे पाहायला ते हवे होते. त्यांनीही बाबांसोबत अनेक वर्षे आनंदवनात सेवा केली आहे. तसेच अखेरचा काळ त्यांनी सुनीताबाईंसोबत आनंदवनातच घालवला होता, अशी आठवणही अॅड. समृद्धी पोरे यांनी उपस्थितांना सांगितली.
पु.ल. आणि सुनीताबाईंची रंगभूषा करण्याचे काम मी केले. त्यामुळे वाचकांना साहित्यकृतीतून शिकायला मिळालेल्या गोष्टी मी थेट त्यांच्या सहवासातून शिकलो. म्हणूनच या रंगमंचावर मी सर्वात युवा तरुण आहे, अशी भावना रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांनी व्यक्त केली.
लोकरंजनातून समाजप्रबोधन करणो हे शाहिरांचे काम पण हेच काम पु.लं.नी आपल्या कलाकृतीतून केले. स्वत:चे दु:ख बाजूला सारून लोकांच्या चेह:यावर हसू आणणारे ते व्यक्तिमत्त्व होते, असे भावोद्गार शाहीर मधू खामकर यांनी काढले. तर भाईंमधील एक गुण तरी आम्ही आमच्यात आणू शकलो म्हणजे आम्ही धन्य झालो, अशी कृतज्ञतापूर्वक भावना नंदेश उमप यांनी व्यक्त केली.
पाच दिवसीय चालणा:या या महोत्सवात पहिल्याच दिवशी ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक सादर झाले. त्यानंतर सायंकाळी देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या तरुणांनी विविध संस्कृतीचे दर्शन घडवीत पारंपरिक नृत्याविष्कार सादर केला. (प्रतिनिधी)