रास्ता रोकोमुळे सीएसटी अर्ध्या तासापासून ठप्प
By Admin | Updated: July 19, 2016 14:19 IST2016-07-19T14:15:03+5:302016-07-19T14:19:50+5:30
दादरमधील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ निघालेल्या सर्वपक्षीय महामोर्च्यातील कार्यकर्त्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

रास्ता रोकोमुळे सीएसटी अर्ध्या तासापासून ठप्प
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - दादरमधील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ निघालेल्या सर्वपक्षीय महामोर्च्यातील कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात न जाता सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सीएसटी परिसरातील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. राणीबाग ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग होता.
प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर तसेच अन्य नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी सर्वपक्षीय मोर्चाचे आवाहन केले होते. त्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. हा मोर्चा चालू असताना दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.