शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

300 पीएचडी विद्यार्थ्यांची फेलोशीप रद्द, संशोधन प्रगती अहवालाला विलंब केल्याने ‘सीएसआयआर’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 06:50 IST

मुंबई : संशोधन प्रगती अहवाल देण्यास विलंब केला म्हणून देशभरातील २०० ते ३०० पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप कौन्सिल ऑफ सायंटिफीक ...

मुंबई : संशोधन प्रगती अहवाल देण्यास विलंब केला म्हणून देशभरातील २०० ते ३०० पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप कौन्सिल ऑफ सायंटिफीक ॲण्ड इंडिस्ट्रिअल रिसर्चने (सीएसआयआर) रद्द केली आहे.

संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर्स असोसिएशन’ने (एआयआरएसए) याबाबत ‘सीएसआयआर’ला पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. ‘सीएसआयआर’ची पीएचडी फेलोशीप मिळविणाऱ्यांना दरवर्षी आपला संशोधनाचा प्रगती अहवाल मार्गदर्शकांच्या सहीने सादर करावा लागतो. हा अहवाल देण्यास विलंब झाल्याने या विद्यार्थ्यांची फेलोशिप रद्द करण्यात आली आहे. 

हे विद्यार्थी विविध विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये काम करीत आहेत. याचा अभ्यासक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यावर प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे त्यांची फेलोशिप रद्द करण्यापूर्वी संशोधक विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी ‘एआयआरएसए’ने केली आहे.

 वैयक्तिक, प्रशासकीय अडचणींबरोबरच संशोधन प्रक्रियेतही विविध आव्हाने उभी राहतात. त्यामुळे प्रगती अहवाल सादर करण्यास विलंब होतो. या विद्यार्थ्यांनी ‘सीएसआयआर’च्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुखांशी संबंध साधून आपल्या अडचणी लेखी व तोंडी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. संघटनेने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. 

फेलोशिपच्या निधीला विलंब   संघटनेने फेलोशिपच्या निधी वितरणात होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले आहे. सीएसआयआरसह अनेक संस्थांकडून फेलोशिपचा निधी मिळण्यास विलंब होतो, असे संघटनेचे म्हणणे आहे.

फेलोशिपसाठी निवडसीएसआयआरतर्फे एम.एस्सी, बी.ई, बी.टेक, एम.टेक, एम.ई, एमबीबीएस, बी.डी.एस, एम.डी, एम.एस, एम.डी.एस, एम.ई, एम.टेक, एम.व्ही.एससी यांसारखी पात्रता असलेल्या  विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप दिली जाते. यासाठी वय ३२ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. पात्रताधारक उमेदवारांचे संशोधन कार्य, अनुभव आदींच्या आधारे मुलाखत घेऊन या फेलोशिपसाठी निवड केली जाते. त्यासाठी दरमहा व आकस्मित म्हणून ठराविक निधी दिला जातो.

टॅग्स :Educationशिक्षण