महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: April 1, 2017 17:23 IST2017-04-01T16:37:43+5:302017-04-01T17:23:59+5:30
सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. पण अनेकदा लोकप्रतिनिधींना याचा विसर पडतो.

महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांमध्ये हाणामारी
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 1 - सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. पण अनेकदा लोकप्रतिनिधींना याचा विसर पडतो आणि ते भर सभागृहात हाणामारीवर उतरतात. भारतातच नव्हे जगातल्या अनेक देशांच्या संसदेमध्ये असे प्रकार घडले आहेत.
शनिवारी नांदेड महापालिकेच्या सभागृहात दोन नगरसेवक पाण्याच्या प्रश्नावरुन परस्परांना भिडले. सविधान पार्टीचे बालासाहेब देशमुख आणि भाजपाचे अभिषेक सौदे या दोघानी सभागृहात एकमेकांच्या अंगावर धाऊन जात हाणामारी केली. हे दोन्ही नगरसेवक आक्रमक होत असल्याचे पाहुन इतर सदस्यांनी हस्तक्षेप करत या दोघांचे भांडण मिटवले.