शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पाण्यापेक्षाही कच्चे तेल स्वस्त!

By admin | Updated: January 9, 2016 04:11 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल ३० डॉलरच्या खाली घसरल्या असून, या घसरलेल्या किमती आणि तेलाच्या अर्थकारणाचा विचार करता सध्या कच्चे तेल बाजारात मिळणाऱ्या

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल ३० डॉलरच्या खाली घसरल्या असून, या घसरलेल्या किमती आणि तेलाच्या अर्थकारणाचा विचार करता सध्या कच्चे तेल बाजारात मिळणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्याचे दिसत आहे. तेलाच्या किमतीमधील हा नऊ वर्षांचा नीचांक असला तरी अद्यापही या किमतीचे पडसाद बाजारातील इंधनात आणि पर्यायाने महागाई कमी होण्याच्या रूपाने प्रतिबिंबित झालेले नाहीत. तेलाच्या किमतीचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याने आता महागाई आटोक्यात येणाराका, याकडे जनेतेचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती या प्रति बॅरल २९.२४ अमेरिकी डॉलर इतक्या होत्या. डॉलर आणि भारतीय रुपयांतील चलनदराच्या अनुषंगाने प्रति बॅरल किमती या दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. एका बॅरलमध्ये १५९ लीटर कच्चे तेल भरले जाते. एका बॅरलपासून सुमारे २७ लीटर पेट्रोल आणि ८५ लीटर डिझेल तयार होते. या सर्व घटकांचे त्रैराशिक मांडल्यास तेलाची किंमत प्रती लीटर १२ ते १४ रुपयांच्या दरम्यान येते. याच अनुषंगाने बाटलीबंद पाण्याचा विचार केला तर पाण्याच्या बाटलीची किंमत ही १२ ते १५ रुपयांच्या दरम्यान आहे.रुपया महागलातेलाच्या किमतीत सातत्याने घसरण झाली असली तरी, या घसरणीला भारतीय रुपयाची मदत लाभू शकलेली नाही. आंतरराष्ट्रीय अर्थकारणाती अस्थिरता आणि सध्या चीनने केलेल्या चलनाच्या अवमूल्यनानंतर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया हा ६६.८२ च्या पातळीवर आहे. त्यामुळे तेलाच्या किमती जरी कमी झाल्या तरी त्याकरिता वाढलेला डॉलर त्याकरिता खर्ची पडत आहे. केंद्रीय उत्पादन शुल्कात पुन्हा वाढ करण्याचे संकेत गेल्या दीड वर्षांत वर्षात तेलाच्या किमती या १४५ डॉलर प्रति बॅरलवरून शुक्रवारी २९.२४ डॉलर प्रति बॅरल इतक्या कमी झाल्या. कमी झालेल्या या किमतीचा अल्प प्रमाणात लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविला असला तरी, सरकारने वित्तीय तूट कमी करण्यासाठी आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आजवर तीन वेळा केंद्रीय उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. तसेच, किमतीमधील घसरण सुरूच राहिल्यास माचपर्यंत पुन्हा उत्पादन शुल्क वाढविण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारच्या तिजोरीत अंदाजे १५ हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे.