सनदी अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी !
By Admin | Updated: October 1, 2015 03:31 IST2015-10-01T03:31:48+5:302015-10-01T03:31:48+5:30
सध्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी महेश पाठक हे मुंबईचे जिल्हाधिकारी असताना घेतलेल्या एका निर्णयावरून चांगलेच अडचणीत येऊ शकतात

सनदी अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी !
यदु जोशी,मुंबई
सध्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी महेश पाठक हे मुंबईचे जिल्हाधिकारी असताना घेतलेल्या एका निर्णयावरून चांगलेच अडचणीत येऊ शकतात. कारण पाठक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राज्य शासनाकडे मागितली आहे.
२००५-०६ च्या सुमारास मुंबई शहराचे जिल्हाधिकारी असताना पाठक यांनी माझगावमधील एका चर्चची लीज संपलेली जमीन एका विकासकाला देण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयाबाबत ठपका ठेवत पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
करावा, अशी भूमिका एसीबीने घेतली असून एसीबीचे तत्कालीन प्रमुख प्रवीण दीक्षित यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे समजते.
जमीन वाटपाच्या या निर्णयामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचा आरोप आहे. मात्र पाठक यांना या निर्णयप्रक्रियेत कुठलाही आर्थिक लाभ झालेला नाही, अशी भूमिका मंत्रालय प्रशासनातील उच्चपदस्थांकडून घेतली जात असल्याचे
समजते.