अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात गर्दी
By Admin | Updated: December 29, 2014 04:54 IST2014-12-29T04:54:34+5:302014-12-29T04:54:34+5:30
ख्रिसमसची सुटी व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात गर्दी
कोल्हापूर : ख्रिसमसची सुटी व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. अंबाबाई मंदिर परिसरात सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोज भाविक येतात. ख्रिसमसनिमित्त अनेक शाळांना सुटी सुरू झाल्याने मंदिराच्या चोहोबाजूंनी दर्शनासाठी चार-पाच रांगा रविवारी लागल्या होत्या.
पन्हाळ्याला पसंती
नववर्षानिमित्त आतापासून पन्हाळा या थंड हवेच्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. पन्हाळ्यातील पर्यटक शहरात आल्याने शहराला जत्रेचे स्वरूप आले होते. (प्रतिनिधी)