मार्केटच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी
By Admin | Updated: September 20, 2016 03:18 IST2016-09-20T03:18:10+5:302016-09-20T03:18:10+5:30
महात्मा फुले भाजी मार्केटचा साखरचौथ गणपती पाहण्यासाठी सोमवारी पनवेल मार्केटमध्ये जनसागर उसळला होता.

मार्केटच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी
पनवेल : महात्मा फुले भाजी मार्केटचा साखरचौथ गणपती पाहण्यासाठी सोमवारी पनवेल मार्केटमध्ये जनसागर उसळला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.
पनवेलच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये साखरचौथ गणपती अनेक वर्षे आणला जातो. या वर्षी लालबागच्या राजाची प्रतिकृती येथे आणल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. अनेकांना लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला मिळत नाही. त्यांना लालबागच्या राजाचे दर्शन मिळावे यासाठी महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये साखरचौथ गणपती हा खास लालबागच्या राजाची प्रतिकृती आणली जाते. या गणपतीलाही अनेक जण त्याच भक्तिभावाने नवस बोलतात. पुढील वर्षी येऊन तो फेडतात. या गणपतीनिमित्त भाजी मार्केटमधील सर्व धर्माचे भाजी विक्र ेते एकत्र येतात. वर्गणी काढून उत्सव साजरा करतात. प्रसाद म्हणून एकत्र भोजन करतात. महिला गणपतीसमोर पारंपरिक खेळ खेळतात. या गणपतीच्या दर्शनासाठी पनवेलबरोबरच आजूबाजूच्या गावातूनही मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनाला येतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी दिली. (वार्ताहर)