काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी
By Admin | Updated: August 17, 2014 01:11 IST2014-08-17T01:11:26+5:302014-08-17T01:11:26+5:30
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी राज्यात पक्षाचे संघटन मजबूत असल्याचे विधानसभेची उमेदवारी मागणा:यांच्या संख्येवरून दिसून येते.

काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी
>2500 जणांचे अजर्, राष्ट्रवादीच्या जागांवर 4क्क् इच्छुक!
यदु जोशी - मुंबई
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी राज्यात पक्षाचे संघटन मजबूत असल्याचे विधानसभेची उमेदवारी मागणा:यांच्या संख्येवरून दिसून येते. काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी अक्षरश: रिघ लागली असून जवळपास 25क्क् जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर 4क्क् जणांनी दावा सांगितला आहे, हे विशेष!
आता आम्हीच सत्तेत येणार, असा दावा महायुतीचे नेते करत असले, तरी भाजपा-शिवसेनेकडे इच्छुकांची जेवढी गर्दी आहे; त्याहून अधिक गर्दी आज काँग्रेसकडे दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 82 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या 114 जागांवरही लढण्याची तयारी काँग्रेसच्या इच्छुकांची दाखविली आहे. सुमारे 4क्क् जणांनी त्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. प्रदेश निवड समितीसमोर रविवारपासून काँग्रेसच्या वाटय़ाला असलेल्या 174 जागांसाठी मुलाखती येथील टिळक भवनात होतील. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. उद्या अमरावती आणि नागपूर विभागातील इच्छुकांच्या मुलाखतींपासून सुरुवात होत आहे.
2क् तारखेला मुलाखती आटोपल्यानंतर लगेच दोन दिवसांत सांसदीय मंडळाची बैठक होऊन प्रत्येक मतदारसंघासाठी उमेदवारांचे एक पॅनेल तयार केले जाईल. त्यानंतर अ.भा.काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक होईल व नंतर होणा:या केंद्रीय निवडणूक समितीत अंतिम यादीवर जवळपास शिक्कामोर्तब होईल. अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा फॉम्यरूला निश्चित करण्यासाठी 18 आणि 19 ऑगस्टला दिल्लीत दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे.
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची विभागीय संख्या अशी - मुंबई 45क्, कोकण 2क्क्, उत्तर महाराष्ट्र 25क्, पश्चिम महाराष्ट्र 4क्क्, मराठवाडा 4क्क्, विदर्भ 8क्क्. इच्छुकांची सर्वाधिक गर्दी विदर्भात दिसते. अर्थात काँग्रेस इतर कुठल्याही विभागापेक्षा जास्त जागा विदर्भातून लढते.