निकाल ऐकण्यासाठी कोर्टरूममध्ये गर्दी

By Admin | Updated: May 9, 2015 01:53 IST2015-05-09T01:53:09+5:302015-05-09T01:53:09+5:30

सलमानला जामीन होणार की तो तुरुंगात जाणार? याचा निकाल ऐकण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी उच्च न्यायालयाबाहेर एकच गर्दी केली होती.

The crowd in the cockpit to hear the results | निकाल ऐकण्यासाठी कोर्टरूममध्ये गर्दी

निकाल ऐकण्यासाठी कोर्टरूममध्ये गर्दी

मुंबई : सलमानला जामीन होणार की तो तुरुंगात जाणार? याचा निकाल ऐकण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी उच्च न्यायालयाबाहेर एकच गर्दी केली होती. या वेळी सलमानला शिक्षा व्हावी यासाठीही काही जण हातात फलक घेऊन उभे होते.
न्या. ठिपसे यांच्या कोर्टरूममध्येही अशीच परिस्थिती होती. सलमानच्या फैसल्याचे वृत्तांकन करण्यासाठी शंभरहून अधिक माध्यमांचे प्रतिनिधी न्या. ठिपसे यांच्या कोर्टरूममध्ये होते. त्यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही तेथे जाता येत नव्हते. या सुनावणीसाठी सलमानची अलविरा ही बहीणदेखील न्यायालयात हजर होती. येथील गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त फौज न्यायालयात हजर होती. प्रत्येकाला नीट तपासूनच न्यायालयात सोडले जात होते.
सलमानला जामीन मिळाल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ‘सलमान भाईने, सबको मदत की है, उसे छोड दो,’ अशा घोषणा त्याचे चाहते देत होते.

Web Title: The crowd in the cockpit to hear the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.