क्रॉस व्होटिंगचा राष्ट्रवादी, शिवसेनेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:48 IST2017-03-02T01:48:02+5:302017-03-02T01:48:02+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला

क्रॉस व्होटिंगचा राष्ट्रवादी, शिवसेनेला फटका
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला होता. मात्र, पॅनल टू पॅनल मतदानाचे प्रमाण कमी होते. क्रॉस व्होटिंगचा फटका १९ प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे उमेदवारांना बसला आहे. तेरा प्रभागांत पॅनलला यश मिळाले असून यामध्ये भाजपााचे अकरा, राष्ट्रवादीचे दोन आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारने चार सदस्यीय पद्धती अवलंबण्यात आली. बहुसदस्यीय पद्धत ही राष्ट्रीय पक्षांसाठी फायद्याची तर छोटे पक्ष आणि अपक्षांचे प्रमाण कमी करणारी होती. त्यामुळे बहुसदस्यीय पद्धतीस राज्य सरकारने मान्यता दिली होती. याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि मनसेला बसला आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याने १ अपक्ष, १ राष्ट्रवादी आणि २ भाजपा अशी स्थिती आहे. तीनमध्ये भाजपा ३, तर राष्ट्रवादी १, पाच व दहामध्ये भाजपा व राष्ट्रवादी प्रत्येकी २, आठमध्ये भाजपा ३, तर राष्ट्रवादी १, तेरामध्ये भाजपा २, तर राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी १. चौदामध्ये राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी २, पंधरामध्ये भाजपा २, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्यकी १, सोळामध्ये भाजपा २ व राष्ट्रवादी २, अठरामध्ये भाजपा २, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी १, वीस आणि एकवीसमध्ये राष्ट्रवादी ३, तर भाजपा १, बाविसमध्ये राष्ट्रवादी ३, तर अपक्ष १, तेवीसमध्ये भाजपा ३ तर, अपक्ष १, प्रभाग क्रमांक चोविसध्ये शिवसेना २, भाजपा १ व अपक्ष १, पंचवीसमध्ये शिवसेना ३ व राष्ट्रवादी १, अठ्ठावीसमध्ये भाजपा २ व राष्ट्रवादी २, तीसमध्ये राष्ट्रवादी ३ व भाजपा १, तर प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये भाजपा ३ व अपक्ष १ असे क्रॉस व्होटिंग झाले आहे. गेल्या वेळची महापालिका निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. (प्रतिनिधी)
>दिग्गज नगरसेवक बसले घरी
क्रॉस व्होटिंगचा फटका दिग्गजांना बसला आहे. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, भाजपाच्या शैला मोळक, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेच्या अश्विनी चिखले, माजी महापौर आर. एस. कुमार, राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, नारायण बहिरवाडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, तानाजी खाडे, अॅड. संदीप चिंचवडे, रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपाचे सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर यांचा समावेश आहे.