शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

धरणाखालील पिके होरपळणार

By admin | Published: November 25, 2015 1:07 AM

सोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

बापू बैलकर,  पुणेसोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पण जर हे पाणी सोडले, तर या धरणाखालील पिके होरपळून जातील. चासकमान लाभक्षेत्रासाठी रब्बीसाठी एकच आवर्तन मिळणार असून, पुढील ७ महिने त्यांना पाणी...पाणी.. करावे लागणार आहे. त्यामुळे सोलापूरसाठी आवश्यक साठा उजनीत असताना, आमच्या धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी करीत आहे. पाणी सोडू नका, यासाठी खेड-शिरूरमधील शेतकऱ्यांनी जलस्रोत प्राधिकरणाकडे विनवनी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर, न्यायालयात धाव घेतली. आता ३0 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर, शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहे. गेल्या महिनाभरापासून हे प्रकरण गाजत आहे. सोलापूरची पाण्याची गरज काय? व येथील धरणातून पाणी सोडल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची माहिती घेतली असता, चासकमान व भामाआसखेड धरणाखालील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ९0 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश आहेत. ३९.८५ दलघमी पाणी येथील शेतीसाठी शिल्लक राहील. यातून फक्त एक आवर्तन होईल. हे आवर्तनही आता सोडले आहे. त्यामुळे शेतीसाठीचे पाणी शिल्लकच राहणार नाही. परत शेतकऱ्यांना पाण्यासाठी पुढील सात महिने पाणी मिळणार नाही. त्यामुळे येथील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे. चासकमान व भामाआसखेड धरणाखालील ४0 हजार हेक्टरक्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. तर, सोलापूरमधील आतापर्यंत ५ हजार एकर क्षेत्राचीच पाण्याची मागणी झाली आहे. जेव्हा आदेश झाले, तेव्हा तर फक्त ५00 हेक्टरचीच मागणी होते. असे असताना १ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पुरेलएवढे पाणी सोडण्याची गरज काय, असा सवाल याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे व धयर््ौशील पलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.1सोलापूरची ५ हजार एकर क्षेत्राची आतापर्यंत पाण्याची मागणी आहे. तसेच, अवघे अडीच टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते. उजनी धरणात १८0३ दलघमी म्हणजे, ६४ टीएमसी अचलसाठा आहे. सरकारच्या परवानगीने तो वापरता येतो. २0११ पासून तो वापरलाही जात आहे. २0११ साली ६ टीएमसी, २0१२ साली ३0 टीएमसी, २0१३ साली १२ टीएमसी व २0१४साली १५ टीएमसी पाणी या अचलसाठ्यातून वापरले आहे. 2मग आताही यातून पाणी वापरणे शक्य असताना पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची गरज काय आहे, जर पिण्यासाठीच पाणी सोडले जात आहे, तर सोलापूरला अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. मग ६१ टीएमसी पाणी अचलसाठ्यात असताना, ते का सोडले जात नाही, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.