शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी, गारपिटीने पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:38 IST

विजेच्या कडकडाटासह सुमारे तासभर पावसाचा मारा, शेतात साठवलेल्या कांद्याचे नुकसान; गहू, हरभरा भुईसपाट, केळींना फटका

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विदर्भ,  मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीचा जोरदार तडाखा बसला आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या बदलत्या हवामानामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा तसेच आंब्यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांत गारपीट व पावसाची नोंद झाली.  बीड जिल्ह्यात वीज पडून जनावरे दगावल्याचीही प्राथमिक माहिती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा, पारनेर, पाथर्डी भागात गारपीट झाली असून कांदा, गहू, मका पिकांसह चाऱ्याचे नुकसान झाले. सोलापूर जिल्ह्यात बार्शी आणि माढा तालुक्यांतदेखील गारांचा पाऊस पडून द्राक्ष, ज्वारी, गहू आणि कांद्याचे नुकसान झाले.  

मराठवाड्याला गारपिटीचा तडाखामराठवाड्याच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात वीज पडून पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या.परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

अहिल्यानगरमध्ये चाऱ्याची हानी, झाडे उन्मळून पडली -जिल्ह्यातील नेवासा, पारनेर, पाथर्डी, अहिल्यानगर तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वारा आणि गारांसह पाऊस झाला. या अवकाळी पावसाने गहू, मका पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. पाचेगाव भागात गारपीट झाली. कांदा झाकण्यासाठी, तसेच गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची दिवसभर लगबग सुरू होती. 

अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा, गहू, मका पिकांसह चारा पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पाथर्डी तालुक्यात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह गारपीट झाली. 

सोलापूर जिल्ह्यात बार्शी, माढा तालुक्याला दणकाजिल्ह्यातील बार्शी आणि माढा तालुक्यांत गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. माढा तालुक्यातील मोडनिंब व अरण, बावी या परिसरात अर्धा तास गारांचा पाऊस पडला. यामुळे द्राक्ष, गहू, ज्वारी, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.  बार्शी तालुक्यातील कुसळंब, पांगरी, कारी परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली असून, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसात कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नसलीतरी शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत पंचनामे करावेत, अशी मागणी  केली जात आहे.

नाशिकला दुसऱ्या दिवशीही तडाखाजिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. गुरुवारी (दि.१९) ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे पिके आडवी झाल्याने बळीराजा हताश झाला आहे. मालेगाव शहर व तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या संध्येला साडेपाचच्या सुमारास तब्बल एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.  तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीटही झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नामपूरसह मोसम खोऱ्यात पावसासह गारपीट झाली. सटाणा तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rain, Hailstorms Devastate Crops; Farmers in Distress

Web Summary : Unseasonal rains and hailstorms have severely damaged crops across Maharashtra. Vidarbha, Marathwada, Khandesh, and Western Maharashtra are affected, causing significant losses to wheat, chickpea, onion, and fruit crops. Farmers are facing distress due to extensive agricultural damage.
टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीCropपीक