शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; "अंधारे बाई, यापुढे याद राखा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:56 IST

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते मग तुमच्यासारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? असं मनसेने म्हटलं आहे.

मुंबई – डिजे, डॉल्बीच्या आवाजावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केले होते. त्यावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर नातवाचा उल्लेख करत टोला लगावला. एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय म्हणून बडा नेता भाष्य करेल. नेत्याच्या नातवाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, मात्र गोर गरिबाचे मुलही चांगले राहिलं पाहिजे असं सुषमा अंधारेंनी म्हटलं होते. त्यावरून आता मनसेने संतप्त इशारा दिला आहे.

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्र लिहित अंधारे बाई, यापुढे याद राखा असा इशारा दिला. या पत्रात म्हटलंय की, हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डिजे आणि लेझर शो मुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने आणि सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी त्याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतंय. सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशावेळी फक्त मनसे आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसतात. म्हणून राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करतायेत असा आरोप त्यांनी केला.

तसेच कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते मग तुमच्यासारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते. शिल्लक सेना प्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणून आपण नैराश्येत आहात. यातूनच संबंध नसताना आपण नातवाला राजकारणाल ओढले. हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. याबाबत आपण खरेतर जाहीर माफी मागितली पाहिजे पण आमच्या देव, देवतांचा संतांचा अपमान करणाऱ्या तुम्ही त्यामुळे आपल्याकडून ही सुसंस्कृत अपेक्षा करणेच चूक आहे असंही शालिनी ठाकरे यांनी ठणकावले.

दरम्यान, आपल्याला ही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली तर तुमच्या मनाला रुचतील का? अंधारे बाई, यापुढे याद राखा, संबंध नसताना जर राजसाहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डिजे वाजवल्याशिवाय राहणार नाही. ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा असा सल्लाही मनसेने सुषमा अंधारे यांना दिला आहे.

टॅग्स :MNSमनसेSushma Andhareसुषमा अंधारेRaj Thackerayराज ठाकरे