शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शेतकऱ्यांवरील संकटांचा अवकाळ संपेना; युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला ब्रेक; मोठा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:40 IST

आधी पावसाने रडवले; पिके पाहिजे तशी आलीच नाहीत... जी आली त्यांनाही बाजारात चांगला भाव मिळेना

रावसाहेब उगले, नाशिकMarathi News ): इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची झळ थेट नाशिकच्या निर्यातक्षम द्राक्ष वाहतुकीला बसली आहे. मागील आठवड्यात हमासने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात एक जहाज उडविले. त्यामुळे जागतिक जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक थांबविली आहे.  मालवाहतूक आणि विमा खर्चात ३० टक्के वाढ, तसेच युरोपपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा विलंब लागणार असल्याने  त्याचा परिणाम भारतातून युरोपियन देशांमध्ये होणाऱ्या द्राक्षनिर्यातीवर झाला आहे. परिणामी, नाशिकसह  राज्यातील निर्यातदारांनी द्राक्ष खरेदी बंद केली आहे.

काय म्हणतात उत्पादक शेतकरी ?

जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात नाशिकमधून खऱ्या अर्थाने द्राक्षे निर्यात केली जातात; परंतु निर्यातदारांनाही अतिरिक्त अडीच ते तीन हजार डॉलरची भाडेवाढ सहन करावी लागेल, असे शिरसगावच्या मॅग्नस फार्म फ्रग्चे संचालक  लक्ष्मण सावळकर यांनी सांगितले. नाशिकच्या कोऱ्हो येथील सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे म्हणाले की, युद्धामुळे जहाज वाहतूक कंपन्यांनी वाहतूक थांबविली आहे. जे कंटेनर या मार्गावर आहेत त्यांना पुढे पाठवायचे की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. पर्यायी मार्गाने कंटेनर पाठवायचे ठरल्यास वेळ आणि पैसा लागणार आहे. 

पांढरं सोनं : पावसात सापडलं अन् भावात घसरलं

विवेक चांदूरकर, खामगाव (जि. बुलढाणा) : अवकाळीच्या तडाख्यातून एकेक झाडं वाचवलं. लागवडपासून ते वेचणीपर्यंत निंदण, फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र हाती येणारं पीक पावसात सापडलं अन् पांढरं सोनं भावात घसरलं. यंदा १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भावाची अपेक्षा होती. मात्र, ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकावा लागत आहे, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत.       

दर्जा घसरल्याचे कारण...

अवकाळी पाऊस, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचा दर्जा घसरला आहे. कापसाची बोंडे खुलली नसून कवळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. गत पाच वर्षांतील कापसाचा हा नीचांकी दर आहे. सन २०२१-२२ मध्ये कापसाचे दर १२ ते १३ हजार रुपयांवर पोहोचले हाेते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली होती. 

५०० रुपयांचा चढ-उतार, हळद उत्पादक झाले हैराण

रमेश वाबळे | हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या दरात दिवसाआड चारशे ते पाचशेंचा चढ-उतार होत आहे. त्यामुळे हळद विक्रीसाठी आणावी की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये द्विधावस्था आहे. तर व्यापारीदेखील खरेदी करताना हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.

आवक वाढली अन् भाव घसरले...

मार्केट यार्डात बुधवारी ६०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. या दिवशी सरासरी १२ हजार ५० रुपये भाव मिळाला. जवळपास दोनशे ते तीनशे रुपयांनी भाव वधारल्यामुळे शुक्रवारी आवक वाढली. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार २ हजार ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. परंतु आवक वाढताच भावात सरासरी ४५० रुपयांची घसरण झाली.

सोयाबीनमुळेही  पदरी निराशा 

मोंढ्यात २१ डिसेंबर रोजी सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० रुपये भाव मिळाला होता. तर दुसऱ्या दिवशी भाव घसरून ४ हजार ५७५ रुपयांवर आले. यंदा उत्पादनात प्रचंड घट झाल्याने किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकbuldhanaबुलडाणाHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी