शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

औषध कंपन्या, कृषी केंद्रांवर फौजदारी गुन्हे - सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:14 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ शेतकरी, शेतमजूर दगावले. ४५० जणांवर उपचार करून सुटी देण्यात आली. यात दोषी आढळणा-या कीटकनाशक कंपन्या आणि त्यांची विक्री करणा-या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्चाधिकार समितीला दिल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

 यवतमाळ  - कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ शेतकरी, शेतमजूर दगावले. ४५० जणांवर उपचार करून सुटी देण्यात आली. यात दोषी आढळणा-या कीटकनाशक कंपन्या आणि त्यांची विक्री करणा-या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्चाधिकार समितीला दिल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. फवारणीमुळे विषबाधित झालेल्या शेतक-यांची भेट आणि मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी खोत बुधवारी जिल्हा दौ-यावर आले होते. त्यांनी आर्णी तालुक्यातील शेंदुरसणी येथील मृत शेतक-याच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या शेताची पाहणी केली. नंतर यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल विषबाधित शेतक-यांची वास्तूपूस केली. तत्पूर्वी त्यांना शेतकरी संघर्ष समितीने निवेदन सादर केले. हे निवेदन स्वीकारत असतानाच एका इसमाने त्यांच्या अंगावर फवारणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रोखले. नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विषबाधा प्रकरणी चौकशीसाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन झाली असून आपण आपल्या दौºयाचा अहवाल समितीला सादर करणार असल्याचे सांगितले. ना. खोत म्हणाले, उपचार करून घरी परतलेल्या विषबाधितांना रूग्ण कल्याण समितीतून आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कपाशीचे बीजी-२ हे वाण कीडींना बळी पडत असल्याने त्याला केवळ संकरित वाण म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार आहे. यामुळे बीजीच्या किंमती कमी होतील. आता प्रत्येक गावात कृषी ग्राम समिती स्थापन केली जाईल. या समितीकडे तक्रारी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. फवारणीमुळे विषबाधा होणे ही कृषी विभागाची जबाबदारी असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र अडीच महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात या घटनांना सुरूवात होऊनही आरोग्य विभागाने याची माहिती का दडविली?, इतर विभागांनीही माहिती का दिली नाही याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश दुशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. ऊसाचे औषध कपाशीवर कसे ?‘उलीस’ नामक औषधाचा ऊसासाठी वापर केला जातो. हेच औषध यवतमाळ जिल्ह्यात कपाशीसाठी वापरण्यात आल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे हे औषध कुठून आले, त्याची कोणत्या कृषी केंद्रातून विक्री झाली या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे ना. सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtraमहाराष्ट्र