‘त्या’ हाणामारीप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांवरही गुन्हे

By Admin | Updated: November 16, 2015 03:38 IST2015-11-16T03:38:39+5:302015-11-16T03:38:39+5:30

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असताना आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधातदेखील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत

Crimes against Shiv Sena workers | ‘त्या’ हाणामारीप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांवरही गुन्हे

‘त्या’ हाणामारीप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांवरही गुन्हे

कल्याण : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असताना आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधातदेखील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. प्रमोद ओहळ आणि देवेंद्र प्रसाद अशी गुन्हा दाखल झालेल्या शिवसैनिकांची नावे आहेत.
येथील पूर्वेकडील महालक्ष्मी शॉपिंग सेंटरच्या परिसरात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हाणामारीची घटना घडली होती. यात शिवसेनेचे प्रमोद ओहळ आणि देवेंद्र प्रसाद हे दोन कार्यकर्ते जखमी झाले होते. ओहळ याने दाखल केलेल्या तक्रारीवरून विशाल जाधव, सचिन जाधव, अनंत गायकवाड आणि शेखर क्षीरसागर या भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
युतीचा महापौर विराजमान होऊन काही तासांचा कालावधी उलटत नाही तोच ही घटना घडली होती. जाईबाई विद्यामंदिर प्रभागात शिवसेनेचे उमेदवार रमेश जाधव यांनी भाजपचे उमेदवार संदीप जाधव यांचा पराभव केला आहे. भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्ह्णाची नोंद करण्यात आल्यानंतर मारहाण, दमदाटी आणि शिवीगाळप्रकरणी आता शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crimes against Shiv Sena workers