कृषी अधिका-यासह ११ जणांवर गुन्हे
By Admin | Updated: January 14, 2015 03:54 IST2015-01-14T03:54:50+5:302015-01-14T03:54:50+5:30
मनरेगाअंतर्गत माती नाला बांध, नाला सरळीकरण, पाझर तलाव, शेत रस्ता आदी कामे मंजूर करण्यात आली.

कृषी अधिका-यासह ११ जणांवर गुन्हे
जिंतूर (जि़ परभणी) : बोगस हजेरी मस्टर आणि मोजमाप पुस्तिकेत बनावट नोंदी करून मनरेगाअंतर्गत लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिंतूर तालुक्यातील दाभा येथील सरपंचासह उपअभियंता, कृषी अधिकारी, ग्रामसेवक आदी ११ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिंतूरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने दिले.
मनरेगाअंतर्गत माती नाला बांध, नाला सरळीकरण, पाझर तलाव, शेत रस्ता आदी कामे मंजूर करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात कामे सुरू न करता खोटे दस्तऐवज तयार करून, मजुरांची बोगस नावे टाकून मजूर मस्टर तयार करण्यात आले. या संदर्भात लिंबाराव घुगे यांनी तक्रार केली होती. प्रशासनाने चौकशी व कार्यवाही न केल्याने घुगे यांनी न्यायालयात दाद मागितली होती.