शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा घटनेचे राज्यभर पडसाद, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 04:31 IST

कोरेगाव भीमा (जि.पुणे) येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगरसह अन्य ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्यात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

मुंबई : कोरेगाव भीमा (जि.पुणे) येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगरसह अन्य ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्यात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्र्तींमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (बुधवारी) महाराष्टÑ बंदची हाक दिली आहे.कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईला १ जानेवारी रोजी २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वढू येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी आलेले होते. पुरेसा पोलीस बंदोबस्तदेखील त्या ठिकाणी होता. मात्र, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी हा काही जणांचा प्रयत्न होता. अशा प्रवृत्तींपासून सावध राहून नागरिकांनी शांतता व संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.कोरेगाव भीमा दुसºया दिवशीही तणावाखालीच आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळी गृहराज्यमंत्रीदीपक केसरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दाखविलेला संयम व स्थानिकांचे सहकार्य मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.दलित, मराठा, ओबीसी व बहुजन बांधवांनी घटनेचा निषेध करावा. यामागील ‘मास्टर मार्इंड’ पोलिसांनी शोधावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी केले आहे.मृत व्यक्तीच्या कुटुंबास१० लाख रुपयांची मदतहिंसाचाराच्या घटनेत झालेल्या एका मृत्यूची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. या शिवाय, ज्यांच्या वाहनांची तोडफोड झालेली आहे त्यांना नुकसानभरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. समाज माध्यमांतून अफवा पसरविणाºयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी बजावले.संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेयांच्यावर गुन्हा दाखलभीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शिवजागर प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अनिता साळवे यांनी या दोघांविरोधात तक्रार दिली आहे. अ‍ॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव जमविणे व असंघटित गुन्हेगारी आदी कलमान्वये हा गुन्हा दाखल केला आहे.सखोल चौकशी करा - आठवलेगेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हजारो-लाखो कार्यकर्ते येतात. पण कधीही अनुचित प्रकार घडला नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केली.शांतता पाळा, न्यायिक चौकशीअमान्य - प्रकाश आंबेडकरमुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली न्यायिक चौकशी मला मान्य नाही. न्यायिक चौकशीला दंडात्मक अधिकार नसतात. त्यामुळे अशी चौकशी म्हणजे निव्वळ धूळफेक ठरण्याची शक्यता आहे. सरकारने न्यायिक चौकशीचे आदेश देवू नयेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आजी न्यायधीशाची नियुक्ती करण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना करावी. तसेच चौकशीसाठी नेमलेल्या न्यायधीशांकडे दंडात्मक कारवाईचे अधिकार द्यावेत, अशी मागणी प्रकाश आंबडेकर यांनी केली. चौकशीसाठी दलित न्यायधीशाची नेमणूक करू नये, असेही ते म्हणाले.हिंसाचारामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप करत महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, पुणे येथील एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांच्यावतीने बुधवारी महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी जाहीर केले. लोकांनी शांततेत बंद पाळाचा तसेच आम्ही बंद पुकारतोय म्हणून इतर संघटनांनी बंद मोडण्याचे काम करू नये, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.‘मास्टर मार्इंड’ शोधा - संभाजी ब्रिगेडदलित, मराठा, ओबीसी व समस्त बहुजन बांधवांनी एकत्रितपणे या विकृत घटनेचा निषेध करावा. तसेच या घटनेमागील ‘मास्टर मार्इंड’ पोलिसांनी शोधावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी केले आहे.लोकशाही मार्गाने लढा देऊ - चव्हाणदलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाजविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे सोमवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.अहमदनगरला २६ बस फोडल्यामंगळवारी नगरसह श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी आणि राहाता येथे पडसाद उमटले़ जमावाच्या दगडफेकीत नगर-श्रीगोंदा येथे प्रत्येकी एक, तर राहाता बसस्थानकात तीन महिला जखमी झाल्या़ जिल्ह्यात २६ बस व चार ते पाच कारचे नुकसान झाले.बस चालकाला जाळण्याचा प्रयत्नजळगावमध्ये बस चालक जगतराव लोटन पाटील यांच्या अंगावर आगीचे गोळे फेकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. ते किरकोळ जखमी झाले व बालंबाल बचावले.कोल्हापुरात दुचाकींची मोडतोडकोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करून घटनेचा निषेध करीत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी बंदची हाक देण्यात आली. काही दुचाकींची तोडफोड झाली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई