‘त्या’ शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा

By Admin | Updated: April 28, 2015 01:34 IST2015-04-28T01:34:20+5:302015-04-28T01:34:20+5:30

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर सेवाग्राम ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता़ मात्र, चौकशीअंती या शिक्षकाने पीडित मुलीवर बलात्कारही केल्याचे उघडकीस आले़

The crime of rape on the teacher ' | ‘त्या’ शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा

‘त्या’ शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा

वर्धा : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर सेवाग्राम ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता़ मात्र, चौकशीअंती या शिक्षकाने पीडित मुलीवर बलात्कारही केल्याचे उघडकीस आले़ हा प्रकार सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयात घडला़ विजय कार्लेकर असे या नराधम शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध रविवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
अटकेतील शिक्षकाने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर डिसेंबरमध्ये दोन वेळा अत्याचार केल्याचे पीडित मुलीने जबाबात म्हटले आहे. मानसिक दडपणात असलेल्या या विद्यार्थिनीने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही; मात्र रविवारी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी पीडित विद्यार्थिनीशी संवाद साधत झालेला हा प्रकार उजेडात आणला. या शिक्षकाकडून मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डॉ. मिरगे यांनी केली होती. पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े (प्रतिनिधी)

Web Title: The crime of rape on the teacher '