लैंगिक शोषणप्रकरणी पाच जणांवर गुन्हे

By Admin | Updated: January 25, 2016 02:50 IST2016-01-25T02:50:17+5:302016-01-25T02:50:17+5:30

महागाव येथील एका दलित मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी, तिच्या प्रियकरासह पाच जणांवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा अहेरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Crime in five sexual abuse cases | लैंगिक शोषणप्रकरणी पाच जणांवर गुन्हे

लैंगिक शोषणप्रकरणी पाच जणांवर गुन्हे

अहेरी (गडचिरोली) : महागाव येथील एका दलित मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी, तिच्या प्रियकरासह पाच जणांवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा अहेरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तिरुपती पोचम पानेम (२६) हा फरार झाला आहे.
या संदर्भात पीडित मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिरुपती याने शेताच्या झुडपात तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्तापित केले.
काही दिवसाने लग्नाबाबत विचारले असता, त्याने लग्नास नकार दिला. ही बाब तिरुपतीच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी घरी येऊन पीडितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली, असेही पीडितेचे म्हणणे आहे.
या तक्रारीवरून अहेरी पोलीस ठाण्यात तिरुपती, त्याची आई, तीन मेहुण्या अशा पाच जणांवर भादंविचे कलम ३७६, ५०६ (२) व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिरुपती हा फरार झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crime in five sexual abuse cases