नऊ शिवसैनिकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By Admin | Updated: March 2, 2016 03:33 IST2016-03-02T03:33:50+5:302016-03-02T03:33:50+5:30

येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमित महादेव अंबादे यांना कर्तव्यावर असताना जातिवाचक शिवीगाळ करीत

The crime of atrocity on nine Shiv Sainiks | नऊ शिवसैनिकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

नऊ शिवसैनिकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

कारंजा (घा.) (वर्धा) : येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमित महादेव अंबादे यांना कर्तव्यावर असताना जातिवाचक शिवीगाळ करीत, कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख नीलेश देशमुख व दोन महिला कार्यकर्त्यांसह
नऊ शिवसैनिकांविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा स्थानिक पोलिसांतर्फे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख नीलेश देशमुख, कारंजा तालुका प्रमुख प्रकाश घागरे, कारंजा शहर प्रमुख संदीप टिपले यांच्यासह शैलेश रमधम, अमोल चरडे, शक्तिसिंग टांक, गोपाल मुन्ने
या शिवसैनिकांना मंगळवारी कारंजा पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती हरणे व प्रियांका वंजारी यांना अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The crime of atrocity on nine Shiv Sainiks