शिष्यवृत्ती पळविणाऱ्यांवर गुन्हे?

By Admin | Updated: November 8, 2014 03:48 IST2014-11-08T03:48:41+5:302014-11-08T03:48:41+5:30

राज्यघटनेतील तरतुदीनुसार समाजकल्याण विभागाचा निधी इतर विभागांकडे वळविता येत नाही. मात्र मागील काही वर्षांत समाजकल्याणचा निधी मोठ्या प्रमाणात इतर कामांकडे वर्ग केला

Crime against those who run scholarships? | शिष्यवृत्ती पळविणाऱ्यांवर गुन्हे?

शिष्यवृत्ती पळविणाऱ्यांवर गुन्हे?

पुणे : राज्यघटनेतील तरतुदीनुसार समाजकल्याण विभागाचा निधी इतर विभागांकडे वळविता येत नाही. मात्र मागील काही वर्षांत समाजकल्याणचा निधी मोठ्या प्रमाणात इतर कामांकडे वर्ग केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा २,३०० कोटींचा निधी अन्यत्र वळविण्यात आला. या प्रकाराची सखोल चौकशी केली जाणार असून, संबंधित दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असे सामाजिक न्याय व आदिवासी विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर कांबळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. कांबळे म्हणाले, की समाजकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा निधी इतरत्र वळविल्याबद्दल संबंधितांवर आणि शिष्यवृत्तीचा पैसा इतर कामांसाठी वापरणाऱ्या महाविद्यालयांवरही गुन्हे दाखल केले जातील. शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांतच मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेमार्फत होणारी समाजकल्याण विभागाची कामे यापुढे थेट सामाजिक न्याय विभागच हाती घेणार आहे. विशेष घटक योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध महामंडळांकडून दिली जाणारी कर्जे यापुढे दिली जाणार नाहीत. त्याऐवजी संबंधित लाभार्थींना गरजेनुसार थेट व्यवसाय उभा करून दिला जाईल तसेच त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षणही देण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against those who run scholarships?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.