सेना आमदार वैभव नाईकांवर गुन्हा
By Admin | Updated: May 2, 2015 10:16 IST2015-05-02T02:22:58+5:302015-05-02T10:16:47+5:30
अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या होड्या जप्त करुन त्याला तहसीलदारांनी लावलेले सील तोडून त्या व्यावसायिकांना दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह २६ जणांवर गुरुवारी रात्री

सेना आमदार वैभव नाईकांवर गुन्हा
सिंधुदुर्ग : अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या होड्या जप्त करुन त्याला तहसीलदारांनी लावलेले सील तोडून त्या व्यावसायिकांना दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह २६ जणांवर गुरुवारी रात्री उशिरा मालवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला़
आजऱ्याचे मंडळ अधिकारी डी़जे़ मुंबरकर यांना आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले असताना त्यांनी नकार दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली़ या कारवाईच्या निषेधार्थ मालवण तालुका तलाठी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे़ निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे़