शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

एमआयएमच्या नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 23, 2017 23:37 IST

एमआयएमच्या नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 23 - तहसील कार्यालयाचे बनावट रजिस्टर तयार करून त्यावर स्वत:च्या जात प्रमाणपत्राच्या नोंदी घेऊन शासनाची आणि तक्रारदाराची दिशाभूल केल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.नगरसेवक जमीर अहेमद कादरी, भाऊ फईम कादरी, भाचा आमेर, मेहुणा जुबेर, राजपूत, दाभाडे आणि दलाल शेख रब्बानी अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. शिनगारे म्हणाले की, जमीर कादरी यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढविताना छप्पर बंद जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी तथा तक्रारदार वाहेद अली झाकेर अली हाश्मी यांनी जमीर कादरी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार नोंदविली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले तेव्हा तहसील कार्यालयाने न्यायालयात शपथपत्र दाखल करून जमीर कादरी यांचे जात प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेच नसल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कादरी यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून निर्णय घेण्याचे म्हटले होते. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे प्रकरण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केले असता तेथे तहसील कार्यालयाचे दुसरे रजिस्टर सादर करून त्या रजिस्टरमध्ये कादरी यांच्या जात प्रमाणपत्राची नोंद असल्याचे दर्शविले होते. ही बाब आरोपींनी तक्रारदारालाही सांगितली होती. दरम्यान, तक्रारदारांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपी जमीर यांनी स्वत:चे छप्पर बंद जातीचे प्रमाणपत्र काढून आणि खोटे रजिस्टर बनवून त्यात जात प्रमाणपत्राच्या नोंदी घेऊन शासनाची आणि तक्रारदारांची दिशाभूल केल्याचे म्हटले. यासाठी अन्य आरोपींनी तक्रारदाराला मदत केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आदी कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार तपास करीत आहेत.