जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर गुन्हा

By Admin | Updated: June 29, 2016 02:36 IST2016-06-29T02:36:23+5:302016-06-29T02:36:23+5:30

शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या महाडमधील एका जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against 40 people including landlord | जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर गुन्हा

जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर गुन्हा


महाड : तालुक्यातील कोथुर्डे येथील एका जमीन मालकाच्या जागेमध्ये दुसऱ्या एका इस्टेट एजन्सीचा फलक बळजबरीने लावल्याप्रकरणी तसेच त्या वादात तलवार, गुप्तीचा धाक दाखवून रखवालदाराला शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या महाडमधील एका जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोरीवली येथील योगेश ओमप्रकाश चोले यांनी फिर्याद दाखल केली आहे. योगेश चोले हे इकबाल कासकर यांच्या मालकीच्या कोथुर्डे येथील जमिनीची रखवाली करतात. २७ जूनला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महाड येथील जमीन व्यावसायिक अविकुमार धुळे व त्यांच्या सोबत इतर चाळीस जण कासकर यांच्या जागेत येवून बळजबरीने इस्टेट एजन्सीचा फलक लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रखवालदार चोले यांना धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अविकुमार धुळे यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल आहे.
जीवे मारण्याची धमकी
महाड येथील जमीन व्यावसायिक अविकुमार धुळे व त्यांच्या सोबत इतर चाळीस जण कासकर यांच्या जागेत येवून बळजबरीने धुळे इस्टेट एजन्सीचा फलक लावल्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रखवालदार चोले यांना गुप्ती आणि तलवारीचा धाक दाखवून फलक लावू न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत तो फलक जबरदस्तीने कासकर यांच्या जागेत लावला. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Web Title: Crime against 40 people including landlord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.