धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गोटे पिता पुत्रासह 40 जणांविरोधात गुन्हा
By Admin | Updated: February 16, 2017 18:43 IST2017-02-16T18:43:28+5:302017-02-16T18:43:28+5:30
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या स्वामी नारायण छात्रालाय एवम मंदिर या संस्थानने गेल्या २२ वर्षांपासून ५० फूट रस्त्यावर केलेलं

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गोटे पिता पुत्रासह 40 जणांविरोधात गुन्हा
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 16 - धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या स्वामी नारायण छात्रालाय आणि मंदिर या संस्थानने गेल्या २२ वर्षांपासून ५० फूट रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी भाजप आमदार अनिल गोटे यांनी आपल्या समर्थकांसह काल रात्री ठिय्या आंदोलन केले. अतिक्रमण काढण्यावर आमदार ठाम होते तर अतिक्रमण काढू नये यासाठी स्वामी नारायण मंदिराच्या भाविकांनी भजन आंदोलन केले. या घडामोडी सुरू असतांना स्वामीनारायण छात्रालयाच्या मागील बाजूची संरक्षक भिंत जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात आली.या प्रकरणी स्वामी नारायण मंदिराचे भाविक नरेंद्र वसंत महाजन यांनी देवपूर पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत भाजप आमदार अनिल गोटे, आमदार पुत्र तेजस गोटे, भाजप कार्यकर्ते अमित दुसाने, राष्ट्रवादीच्या नगरसेविका नलिनी वाडीले यांचा मुलगा मुन्ना हनुमंत वाडीले , राष्ट्रवादी कार्यकर्ता गणेश जाधव अशा एकूण ४० जणांविरोधात भा दं वि २९५, १४३,१४७,४४८,४२७,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.