हाणामारी प्रकरणी सभापतीसह २७ जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: August 3, 2014 00:25 IST2014-08-03T00:25:49+5:302014-08-03T00:25:49+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात काठय़ा, दगड व पाईपने हाणामारीची घटना घडली.

हाणामारी प्रकरणी सभापतीसह २७ जणांविरुद्ध गुन्हा
खानापूर : नजीकच्या कोठारी बुद्रुक गावात १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२.३0 वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात काठय़ा, दगड व पाईपने हाणामारीची घटना घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले.या प्रकरणी दोन्ही गटांनी पातूर पोलिस स्टेशनमध्ये परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पंचायत समितीच्या सभापतीसह २७ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेबाबत पोलिस स्टेशनमध्ये कोठारी येथील रहिवासी फिर्यादी शमीमखाँ मियाखाँ पठाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ .३0 वाजताच्या दरम्यान त्यांच्या मुलांच्या ऑटोरिक्षासमोर तितली भवराचा जुगार खेळणार्या गावातील काही लोकांना त्यांच्या मुलांनी मनाई केली होती.या बाबीने चिडून जाऊन गावातील रघुनाथ उत्तम शिंदे, बाजीराव शिंदे, पातूर पंचायत समितीचे सभापती संजय चिंतामण लोखंडे, गजानन शिंदे, इशा शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, रामेश्वर शिंदे,आप्पा गंगा शिंदे, विश्वनाथ सोळंके,उत्तम शिंदे, शिवाजी शितोळे,यांच्यासह दोन महिलांनी त्यांच्या मुलास शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी देऊन काठय़ा, दगड व पाईपने मारहाण केली व जखमी केले.या घटनेत उत्तम शिंदे हे जखमी झाले असून, त्यांना सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.या प्रकरणी वर उल्लेख केलेल्या लोकांविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७,१४८,१४९, ३२३,३२४,३३६ ५0४ व ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बाजीराव शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी दुसर्या गटातील रघुनाथ उत्तम शिंदे यांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते १ ऑगस्ट रोजीदुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास त्यांच्या आई-वडिलांसह देवदर्शनास जात असताना जुन्नू हमीदखाँ पठाण, शमीमखाँ मियाखाँ पठाण, शहजादखाँ शमीमखॉँ पठाण, शहबाजखाँ शमीमखाँ पठाण, अस्लमखाँ पठाण, शेख जुबेर शेख हमीद , शेख हमीद, अर्शदखाँ पठाण, शे.शरिफखाँ शे.अजीद, शे.राजीक शे.अजीज, परवेजखाँ पठाण, शहीमखाँ पठाण यांनी त्यांना जोगड्या म्हटले.यावरून वाद झाला असता वर उल्लेख केलेल्या लोकांनी फिर्यादी व त्याच्या नातेवाइकांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देऊन काठय़ा, पाईप व दगडांनी मारहाण केली. याबाबतच्या तक्रारीवरून वर उल्लेख केलेल्या लोकांविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ३३६ ५0४ व ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील काही आरोपी फरार असून पातुर पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहे.