शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Crime: दोन कोटींच्या विम्यासाठी मृतदेह केला जिवंत, मुंबईत दाखल गुन्हा नगर पोलिसांत वर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 14:41 IST

Crime News: दोन कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल यांनी संगनमताने बेवारस मृतदेहालाच जिवंत व्यक्तीचे नाव दिले.

आढळगाव (जि. अहमदनगर) - दोन कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल यांनी संगनमताने बेवारस मृतदेहालाच जिवंत व्यक्तीचे नाव दिले. दावा करण्यासाठी बनावट आई-वडील उभे केले. सर्वांनी मिळून दोन कोटी रुपयांचा लाभही घेतला. मात्र, काहींनी ही बातमी अखेर विमा कंपनीपर्यंत पोहोचवली आणि या सर्वांचे बिंग फुटले. २०१५-१६ या दोन वर्षांत घडलेल्या या फसवणूकप्रकरणी विमा कंपनीने मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला, तो आता नगरला वर्ग झाला आहे. 

या प्रकरणात दोन कोटींचा बोगस विमा मिळविण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे (रा. करमाळा, जि. सोलापूर ) यास नुकतीच मुंबई पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोेपी पोलिस काॅन्स्टेबल कैलास देशमुख याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

एप्रिल २०१५ मध्ये एलआयसीच्या दादर (मुंबई) शाखेकडून दिनेश प्रमोद टाकसाळे  या व्यक्तीने दोन कोटींचा विमा घेतला. १४ मार्च २०१७ रोजी दिनेश टाकसाळे याच्या आई-वडिलांनी दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याची कागदपत्रे सादर करत विमा रकमेवर दावा केला. सदर दावा एलआयसीकडून मंजूर करण्यात आला. परंतु, शंका आल्याने एलआयसीने या प्रकरणाची चौकशी केली. तब्बल सहा वर्षे चौकशी केल्यानंतर दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर दोन कोटींल्या बोगस विमाप्रकरणी ओमप्रकाश साहू (सहायक प्रशासकीय अधिकारी एलआयसी दादर शाखा ) यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात २१ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांनी तपास करून दिनेश प्रमोद टाकसाळे, त्याला मदत करणारे सहकारी अनिल भीमराव लटके, विजय रामदास माळवदे या तिघांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर