शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

मराठमोळ्या केदार जाधवने घेतली फडणवीसांची भेट; राजकीय एंट्रीबाबत चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 20:24 IST

Devendra Fadnavis: केदार जाधवने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तो राजकीय क्षेत्रातही एंट्री करणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

Cricketer Kedar Jadhav ( Marathi News ) : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू केदार जाधव हा आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी आणि अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र आज केदार जाधव हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. केदारने आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मागील काही महिन्यांपासून केदार जाधव हा संघाबाहेर आहे. अशातच आज त्याने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तो राजकीय क्षेत्रातही एंट्री करणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा पुणेकर असलेल्या केदार जाधव याने आज आपल्या खासगी कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मात्र मागील काही दिवसांतील केदार जाधव याची ही दुसरी भेट आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मराठमोळ्या केदारने घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटून सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या भेटीवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते. 

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याशीही केदार जाधवची जवळीक आहे. त्यामुळे केदार जाधव खरंच राजकीय क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरू करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द

अष्टपैलू खेळाडू असलेल्या केदार जाधवनं भारताकडून ७३ एकदिवसीय सामने खेळले असून १ हजार ३८९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत दोन शतकं आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. केदारने नऊ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही केदार जाधवने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने आरसीबी आणि सीएसके या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून तो आयपीएल सामन्यांसाठी मराठीमध्ये समालोचन करत आहे. 

टॅग्स :Kedar Jadhavकेदार जाधवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४