क्रेडिट कार्ड योजना झाली लोकप्रिय
By Admin | Updated: October 7, 2015 05:04 IST2015-10-07T05:04:56+5:302015-10-07T05:04:56+5:30
शासनाने शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक लागवडीसाठी आर्थिक सहाय्यक देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. विविध बँकांमार्फत या योजनेतून

क्रेडिट कार्ड योजना झाली लोकप्रिय
बुलडाणा : शासनाने शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक लागवडीसाठी आर्थिक सहाय्यक देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. विविध बँकांमार्फत या योजनेतून गत पाच वर्षात १५ हजार ७३१ शेतकऱ्यांना किसान के्रडिट कार्डचे वाटप करुन त्यांना लघु व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करण्यात
आले.
ग्रामीण नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यातही सधन शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसतच आहेत.
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील हजारो हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान नेहमीच होते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून दिलासा मिळाला.
(प्रतिनिधी)
शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत राज्य सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, वाणिज्यिक बँकांसह या योजनेत सहभागी इतर अठरा राष्ट्रीय बँकांकडून गत पाच वर्षात शेतकऱ्यांना ४६ हजार ९४८ कोटी रूपये लघु व दीर्घ मुदतीचे पीक कर्जासाठी वाटप करण्यात आले. हातात पैसा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत पेरणी हंगामात कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांचा आलेख
वर्षशेतकरी
(हजार)
२०१०-११३३७२.२
२०११-१२३६६३.७
२०१२-१३३०९४.२
२०१३-१४३३०२.६
२०१४-१५२२९८.३
एकूण१५७३१