मुंबई - वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्स' या वैद्यकीय परिषदेचे मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे २७ व २८ मार्च असे दोन दिवस आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेत जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. 'पल्स' वैद्यकीय परिषदेचे भव्यदिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून 'वेलनेस' उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील 'महाराष्ट्र ब्रेड' निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
फडणवीस यांनी संगितले की, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चामधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल. वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी. तर ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.
अशी असणार परिषद
परिषदेचे उद्घाटन २७ मार्च रोजी होईल. परिषदेत प्लेनरी, ३६० डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत. तसेच उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती असणारी दालने असणार आहेत. परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील. जगातील नामांकित वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभाग घेणार आहेत. भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतीतील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार आहेत. तसेच प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा, 'टेक टॉक' असणार आहे.
Web Summary : CM Fadnavis directs making Maharashtra a wellness tourism brand through the 'Pulse' medical conference in Mumbai. The conference, featuring global experts, will focus on startups, research, and strengthening rural healthcare. Investment deals and discussions on future medical education are planned.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने मुंबई में 'पल्स' मेडिकल सम्मेलन के माध्यम से महाराष्ट्र को वेलनेस पर्यटन ब्रांड बनाने का निर्देश दिया। वैश्विक विशेषज्ञों वाले इस सम्मेलन में स्टार्टअप, अनुसंधान और ग्रामीण स्वास्थ्य सेवा को मजबूत करने पर ध्यान केंद्रित किया जाएगा। निवेश सौदे और भविष्य की चिकित्सा शिक्षा पर चर्चा की योजना है।