फेसबुकवरील अश्लील पोस्टवरून हाणामारी

By Admin | Updated: April 22, 2017 01:51 IST2017-04-22T01:51:38+5:302017-04-22T01:51:38+5:30

वसईतील पाचूबंदर गावात फेसबुकवरील अश्लील पोस्टमुळे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर विनयभंग,

Crash on Facebook from pornographic posts | फेसबुकवरील अश्लील पोस्टवरून हाणामारी

फेसबुकवरील अश्लील पोस्टवरून हाणामारी

वसई : वसईतील पाचूबंदर गावात फेसबुकवरील अश्लील पोस्टमुळे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पाचूबंदर गावातील डॅरल मिरची (१८) आणि त्याच गावातील जेरॉम मनभाट (२०) यांच्यात फेसबुकवरून अश्लील मेसेज टाकण्यावरून वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डॅरलच्या घरावर जेरॉम याने साथीदारांसह हल्ला केला. जेरॉम आणि त्साथीदारांनी डॅरलसह त्याचे वडील नाझरेथ, काका विजय मिरची यांना लोखंडी सळई, कोयत्याने हल्ला केला. डॅरलच्या बहिणीला मारहाण करून, तिचा विनयभंग केला. त्यांनी अर्धा तास मारहाण केल्याची तक्रार डॅरल मिरची याने पोलिसांत केली.
मारामारीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी आरोपी पसार झाले. पोलिसांनी जेरॉमसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crash on Facebook from pornographic posts