क्रेन तुटल्याने दोन मजूर ठार

By Admin | Updated: May 30, 2016 03:57 IST2016-05-30T03:57:43+5:302016-05-30T03:57:43+5:30

अंबील वडगाव येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गीअर रॉड तुटल्याने अंगावर लोखंडी टोपले पडून दोन मजूर शनिवारी सकाळी मृत्युमुखी पडले.

Crane collapse killed two laborers | क्रेन तुटल्याने दोन मजूर ठार

क्रेन तुटल्याने दोन मजूर ठार


नेकनूर (जि. बीड) : अंबील वडगाव येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गीअर रॉड तुटल्याने अंगावर लोखंडी टोपले पडून दोन मजूर शनिवारी सकाळी मृत्युमुखी पडले.
त्रिंबक मुरलीधर खराडे (४८) व बिभीषण दगडू वाघमारे (४५) अशी मृत मजुरांची नावे आहेत. यातील वाघमारे हे रोजगाराच्या शोधात उस्मानाबाद जिल्ह्यातून अंबील वडगाव येथे मेव्हण्याच्या गावात सात वर्षांपूर्वीच स्थायिक झाले होते.
सकाळी न्याहरी करण्यासाठी ते दोघे क्रेनच्या लोखंडी टोपल्यात बसून वर येत असतानाच गीअर बॉक्सचा रॉड तुटला. त्यानंतर टोपले उंचावरून खाली कोसळले. ही विहीर कोरडीठाक होती व खडक उघडा पडलेला होते. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले.

Web Title: Crane collapse killed two laborers