मध्य रेल्वेची मे महिन्यात ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 19:02 IST2021-06-02T19:01:24+5:302021-06-02T19:02:35+5:30
व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या निरंतर प्रयत्नामुळेच कोविड आव्हाने असूनही मध्य रेल्वेने मे २०२१ या महिन्यात मालवाहतूक लोडिंग मध्ये भर पाडली आहे.

मध्य रेल्वेची मे महिन्यात ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक
डोंबिवली: व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या निरंतर प्रयत्नामुळेच कोविड आव्हाने असूनही मध्य रेल्वेने मे २०२१ या महिन्यात मालवाहतूक लोडिंग मध्ये भर पाडली आहे. मे २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ६.३२ दशलक्ष टन वाहतूक केली जी मे २०२० मधील ४.३३ दशलक्ष टन च्या तुलनेत ४५.९%जास्त होते. मे २०२१ मध्ये ३.५७ दशलक्ष टन कोळसा, ०.२१ दशलक्ष टन लोह व स्टील, ०.५८ दशलक्ष टन सिमेंट, ०.८६ दशलक्ष टन कंटेनर आणि १.१० दशलक्ष टन खत, पीओएल इत्यादींचा समावेश असलेले इतर मालवाहतूक लोडिंग केली आहे.
एप्रिल ते मे २०२१ या काळात मध्य रेल्वेने १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी २०२० मधील याच कालावधीतील ७.५५ दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत ६६.५ टक्क्यांनी जास्त आहे. मध्य रेल्वेतील १२.५७ दशलक्ष टन मालवाहतुकीत मुंबई विभाग २.८३ दशलक्ष टन, भुसावळ विभाग ०.९५ दशलक्ष टन, नागपूर विभाग ७.३० दशलक्ष टन, पुणे विभाग ०.२९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभाग १.२० दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे.
रेल्वेतील मालवाहतूक अतिशय आकर्षक करण्यासाठी रेल्वेमध्ये अनेक सूट /सवलतीही दिल्या जात आहेत. वेगवान मालवाहतूकीसाठी केलेल्या सुधारणेमुळे सर्व भागधारकांच्या पैशांची बचत होते. वर्षभरात मालवाहतूकी चा वेग जवळजवळ दुप्पट झालेला आहे.