सीपीएस कॉलेजवर निर्बंध घालण्यास कोर्टाचा नकार
By Admin | Updated: February 21, 2015 02:59 IST2015-02-21T02:59:42+5:302015-02-21T02:59:42+5:30
(सीपीएस) कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध लादणारा अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नकार दिला.

सीपीएस कॉलेजवर निर्बंध घालण्यास कोर्टाचा नकार
नागपूर : मुंबई येथे मुख्यालय व नागपूरसह देशभरात १०९ शाखा असलेल्या ‘कॉलेज आॅफ फिजिशियन्स अॅन्ड सर्जन्स’वर (सीपीएस) कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध लादणारा अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नकार दिला. त्याऐवजी याविषयीची जनहित याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून हा विषय लवकर निकाली काढण्यात येईल असे स्पष्ट केले.
न्या. भूषण गवई व न्या. मृदुला भटकर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या याचिकेत सदर महाविद्यालय अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कॉलेजचे काम कायद्यानुसारच
कॉलेज आॅफ फिजिशियन्स अॅन्ड सर्जन्सने प्रतिज्ञापत्र सादर करून स्वत:चे समर्थन केले आहे. १९१६ च्या कायद्यानुसार महाविद्यालयाचे संचालन योग्य असून महाविद्यालयाला मेडिकल कौन्सिलच्या मान्यतेची गरज नाही, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.