राज ठाकरे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By Admin | Updated: March 8, 2016 02:55 IST2016-03-08T02:55:55+5:302016-03-08T02:55:55+5:30
दोषारोपपत्र रद्द करण्याविषयीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए.व्ही. निरगुडे आणि न्या. आय.के. जैन यांनी सोमवारी फेटाळला.

राज ठाकरे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
औरंगाबाद : दोषारोपपत्र रद्द करण्याविषयीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए.व्ही. निरगुडे आणि न्या. आय.के. जैन यांनी सोमवारी फेटाळला. २००८ साली मुंबईमध्ये झालेल्या रेल्वेच्या नोकर भरतीच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवारांनाच संधी मिळावी, अशी भूमिका घेत, बिहारी आणि उत्तर प्रदेशच्या तरुणांना मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर जमशेदपूरच्या न्यायालयाने राज यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार, त्यांना मुंबईमध्ये अटक झाली होती. त्याचे पडसाद राज्यात उमटले होते. कन्नडमधील पिशोर येथे बस जाळल्यासंदर्भात राज ठाकरे यांच्यासह सहा मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याचे दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी हा अर्ज करण्यात आला होता.