पोलीस भरतीतील बळींची न्यायालयाकडून गंभीर दखल

By Admin | Updated: June 17, 2014 03:18 IST2014-06-17T03:18:26+5:302014-06-17T03:18:26+5:30

सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीला स्थगिती द्यावी व यात बळी गेलेल्या चार उमेदवारांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी,

Court recruitment scandal involves serious interference by the court | पोलीस भरतीतील बळींची न्यायालयाकडून गंभीर दखल

पोलीस भरतीतील बळींची न्यायालयाकडून गंभीर दखल

मुंबई : सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीला स्थगिती द्यावी व यात बळी गेलेल्या चार उमेदवारांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर राज्याच्या अतिरिक्त गृह सचिव व पोलीस महासंचालक यांनी प्रत्युत्तर सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले़
याप्रकरणी आॅल महाराष्ट्र ह्युमन राइट््स वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयाला पत्र लिहिले होते़ या भरती प्रकियेत चार जणांचा बळी गेला़ भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना पाणी, जेवण, शौचालय व राहण्याची सोय शासनाने केली नाही़
या भरतीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली होती़ त्याची दखल घेत न्यायालयाने पत्राचे स्वत: जनहित याचिकेत रूपांतर केले़ मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ पुढील सुनावणी २३ जूनला होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Court recruitment scandal involves serious interference by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.