इंद्राणी मुखर्जीच्या सीबीआय चौकशीला कोर्टाची परवानगी
By Admin | Updated: October 7, 2015 14:04 IST2015-10-07T14:04:52+5:302015-10-07T14:04:52+5:30
शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व अन्य दोघा आरोपींच्या सीबीआय चौकशीला विशेष न्यायालयाने बुधवारी हिरवा कंदील दाखवला आहे.

इंद्राणी मुखर्जीच्या सीबीआय चौकशीला कोर्टाची परवानगी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व अन्य दोघा आरोपींच्या सीबीआय चौकशीला विशेष न्यायालयाने बुधवारी हिरवा कंदील दाखवला आहे. सीबीआय आता तुरुंगात मुखर्जी व अन्य दोघांची १२ दिवस चौकशी करणार आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून सीबीआयने काही दिवसांपूर्वी या प्रकरणी गुन्हादेखील दाखल केला आहे. मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शाम रॉय हे तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिघांच्या चौकशीची परवानगी मिळावी यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने सीबीआयला इंद्राणी व अन्य दोघांच्या चौकशीला परवानगी दिली. सीबीआय या तिघांची १९ ऑक्टोबरपर्यंत चौकशी करु शकेल असे कोर्टाने म्हटले आहे. तपास यंत्रणेला आवश्यकता असल्यास ते चौकशीच्या परवानगी पुन्हा अर्ज करु शकतात असेही कोर्टाने स्पष्ट केले.