आईला न सांभाळणाऱ्या प्राध्यापकास कोर्टाची तंबी, उदरनिर्वाहासाठी दरमहा पैसे देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 07:34 AM2021-11-28T07:34:18+5:302021-11-28T07:34:36+5:30

Court News: ‘तो’ पाच वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले. आईने मोलमजुरी करून त्याला शिकवले, तो प्राध्यापक झाला, लाखाच्यावर पगार घेऊ लागला. मात्र आईचा सांभाळ करण्यास नकार दिला.

Court orders payment of subsistence allowance to professor who does not take care of mother | आईला न सांभाळणाऱ्या प्राध्यापकास कोर्टाची तंबी, उदरनिर्वाहासाठी दरमहा पैसे देण्याचे आदेश

आईला न सांभाळणाऱ्या प्राध्यापकास कोर्टाची तंबी, उदरनिर्वाहासाठी दरमहा पैसे देण्याचे आदेश

googlenewsNext

पैठण(जि. औरंगाबाद) : ‘तो’ पाच वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले. आईने मोलमजुरी करून त्याला शिकवले, तो प्राध्यापक झाला, लाखाच्यावर पगार घेऊ लागला. मात्र आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. शिवाय विश्वासघात करून तिच्या नावावरील जमीनही विकली. ९५ व्या वर्षी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वृध्द आईला मुलाने दरमहा सात हजार रुपये द्यावेत असे आदेश पैठण न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. वाघ यांनी दिले.
पैठण येथील प्रयागाबाई बाबुराव आनंदकर (९५, रा. रामनगर) यांनी प्राध्यापक असलेला मुलगा सांभाळत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी पैठण न्यायालयात ॲड. विजकुमार मुळे, ॲड. सचिन पाटील, ॲड. ए.ए. राका यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी साक्षपुरावे व झालेल्या सुनावणीतून सव्वा लाख रूपये पगार असलेला मुलगा आईचा सांभाळ करत नसल्याचे ॲड. विजयकुमार मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
पती नसताना तीन मुली व एक मुलाचा कष्टाने संभाळ करुन मुलींची लग्ने केली तर मुलाला प्राध्यापक बनवले. मुलासाठी जमीन पाहिजे म्हणून चार एकर जमीन जपून ठेवली. मुलगा मोठा झाल्यावर सुखाचे दिवस पाहायला मिळतील ही भाबडी आशा बाळगणाऱ्या प्रयागाबाईच्या मुलाने तिचा विश्वासघात करुन जमीन विकली. आणि तिला वाऱ्यावर सोडले. प्रयागबाईला तीन मुलींकडे आसरा घ्यावा लागत आहे अशी भूमिका वकिलांनी न्यायालयासमोर मांडली. मुलगा प्रा. अर्जुन आनंदकर याला पैठण न्यायालयाने खडे बोल सुनावून दरमहा सात हजार रूपये आईच्या उदरनिर्वाहासाठी देण्याचे आदेश काढले. संबंधित रक्कम आठ दिवसांच्या आत जमा करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: Court orders payment of subsistence allowance to professor who does not take care of mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.