पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे युगुलाचा मृत्यू

By Admin | Updated: November 1, 2015 17:13 IST2015-11-01T17:08:13+5:302015-11-01T17:13:45+5:30

पुण्यात घरातील पेस्ट कंट्रोलमुळे गुदमरुन एका युगुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धवल लगाडिया आणि मंदिरा चौधरी असे या प्रेमी युगुलाचे नाव आहे.

Couple of deaths due to paste control in Pune | पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे युगुलाचा मृत्यू

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे युगुलाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १ - पुण्यात घरातील पेस्ट कंट्रोलमुळे गुदमरुन एका  युगुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धवल लगाडिया आणि  मंदिरा चौधरी असे या प्रेमी युगुलाचे नाव आहे. 

यमुनानगरमध्ये राहणा-या लगाडिया कुटुंबीयाच्या शनिवारी घरी पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. संध्याकाळी धवल त्याची मैत्रिण मंदिराला घेऊन घरी आला होता. काही वेळाने पेस्ट कंट्रोलमध्ये गुदमरुन दोघेही बेशुद्ध झाले. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री उशीरा धवलचा तर रविवारी सकाळी मंदिराचा मृत्यू झाला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Couple of deaths due to paste control in Pune