देशातील रेडिओलॉजिस्ट १ सप्टेंबरपासून संपावर

By Admin | Updated: August 28, 2016 20:53 IST2016-08-28T20:53:44+5:302016-08-28T20:53:44+5:30

मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्यामुळे न्याय मिळवण्यासाठी देशभरातील रेडिओलॉजिस्टनी संपाचे हत्यार उगारले आहे

The country's radiologist has been suspended from September 1 | देशातील रेडिओलॉजिस्ट १ सप्टेंबरपासून संपावर

देशातील रेडिओलॉजिस्ट १ सप्टेंबरपासून संपावर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - सरकार दरबारी रेडिओलॉजिस्टच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्यामुळे न्याय मिळवण्यासाठी देशभरातील रेडिओलॉजिस्टनी संपाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होणार असून, संपामुळे अनेक रुग्ण उपचाराविना राहण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. येत्या १ सप्टेंबरपासून देशासह राज्यातील २ हजार रेडिओलॉजिस्ट बेमुदत संप पुकारणार असल्याची माहिती इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक (पीएनडीटी) डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले. त्यामुळे देशासह राज्यभरातील रुग्ण सेवा सलाइनवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. 

Web Title: The country's radiologist has been suspended from September 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.