नियोजन आयोग मोडीत काढल्यास देशाला किंमत मोजवी लागेल- मुख्यमंत्री चव्हाण
By Admin | Updated: August 19, 2014 19:13 IST2014-08-19T19:13:42+5:302014-08-19T19:13:42+5:30
नियोजन आयोग रद्द केल्यास देशाला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे

नियोजन आयोग मोडीत काढल्यास देशाला किंमत मोजवी लागेल- मुख्यमंत्री चव्हाण
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १९ - नियोजन आयोग रद्द केल्यास देशाला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. वित्तिय आयोग मुक्त अर्थव्यवस्थेच्या हाती सोपवून आपण मोठी चुक करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी नियोजन आयोग रद्द करून त्याऐवजी नवीन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी ६० वर्ष जुनी व्यवस्था मोडीत काढून नवीन व्यवस्था स्थापन करण्याची घोषणा केली होती. तसेच नियोजन आयोग रद्द करत त्याऐवजी नवीन संस्था स्थापण्यासाठी जनतेकडून सुचनाही मागवल्या आहेत. नियोजन आयोग रद्द करून नवीनसंस्था अधिक प्रभावशाली, न्यायनिष्ठूर व पारदर्शक करण्याची मोदींनी घोषणा केली आहे.
देशातील आर्थिक विकासाचा वेळोवेळी आढावा घेत त्यात बदल सुचवण्याची मुख्य जबाबदारी नियोजन आयोगाची आहे. तसेच आर्थिक अडथळे आणणा-या गोष्टींची कारणे शोधणे तसेच पंचवार्षिक योजनांचे नियोजन करणे इत्यादी महत्वाची कामे नियोजन आयोगावर आत्तापर्यंत सोपवण्यात आली आहेत.