शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी
By Admin | Updated: February 6, 2017 02:58 IST2017-02-06T02:58:20+5:302017-02-06T02:58:20+5:30
कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी झालेल्या मतदानाची

शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी
ठाणे : कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी
मतमोजणी होणार आहे. नवी मुंबईच्या वाशी येथील सेक्रेट हार्ट हायस्कूल, सेक्टर ४, वाशी येथे ६ फेब्रुवारी, सकाळी ८ वाजेपासून तिला प्रारंभ होणार आहे. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
कोकणातील ९८ मतदान केंद्रांवर ४८.९४ टक्के झालेल्या या मतदानासाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
दहापैकी आठ उमेदवार ठाणे जिल्ह्यातील आहेत.