देशभरातील मतमोजणीला सुरूवात
By Admin | Updated: May 16, 2014 07:47 IST2014-05-16T07:47:00+5:302014-05-16T07:47:00+5:30
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.

देशभरातील मतमोजणीला सुरूवात
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.
मुंबईसह देशातील प्रमूख शहरांमध्ये मतमोजणी केंद्रावर निवडणूक अधिकारी हजर झाले असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून देशभरातील मतमोजणीसाठी जवळपास ९८९ मतमोजणी केंद्र उभारण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली असून साडे आठ ते नऊच्या दरम्यान पहिला निकाल येण्याची शक्यता आहे.