शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो 'काऊंटडाऊन'सुरु;अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विषय निहाय वेळापत्रक जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 20:44 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १२ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देपुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांमधील २ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एकसारखाच वेळ शेड्युल अँड टाईम टेबल या लिंक वर सर्वात शेवटी 'टाईम टेबल' ही स्वतंत्र लिंक

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १२ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठातर्फे सर्व विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी होणार आहेत.        पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या सुमारे २ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यातील सुमारे १ लाख ९३ हजार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. उर्वरित विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार असून काही विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा पर्यायच निवडलेला नाही. पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून एका पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाईल. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी १०० हून अधिक परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तीनही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण होणार नाही याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.         गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांना सुमारे दहा दिवस विलंब झाला आहे. कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन मागे घेतल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यापीठातर्फे शुक्रवारी सर्व विषयांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.तसेच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन  केले आहे.अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने एजन्सी निश्चित केली असून या एजन्सीकडून विद्यापीठात स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना  परीक्षेपूर्वी तीन दिवस ऑनलाइन परीक्षेचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एक सारखाच वेळ दिला आहे.--------------------विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक्झाम पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध करून आहे. शेड्युल अँड टाईम टेबल या लिंक वर सर्वात शेवटी 'टाईम टेबल' ही स्वतंत्र लिंक दिली आहे.त्यात बॅकलॉग आणि नियमित विद्यार्थ्याच्या परीक्षांचे वेळापत्रक आहे.---------------------

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय