आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे करणार समुपदेशन
By Admin | Updated: November 17, 2014 03:38 IST2014-11-17T03:38:23+5:302014-11-17T03:38:23+5:30
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांना आता समुपदेशनातून मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे करणार समुपदेशन
संतोष येलकर, अकोला
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांना आता समुपदेशनातून मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शासनामार्फत लवकरच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यंदा अल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडीद हे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही घट झाली असून, नापिकी आणि कर्जामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यापार्श्वभूमीवर आत्महत्या रोखण्यासाठी नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन, त्यांना समुपदेशनाद्वारे मानसिक धीर देण्याची उपाययोजना अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.