आयसीसच्या प्रेमात पडलेल्या ६ जणांचे एटीएसकडून समुपदेशन
By Admin | Updated: April 12, 2017 20:07 IST2017-04-12T20:07:21+5:302017-04-12T20:07:21+5:30
आयसीसीस च्या प्रेमात पडलेल्या सहा तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली.

आयसीसच्या प्रेमात पडलेल्या ६ जणांचे एटीएसकडून समुपदेशन
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून नावारुपाला आलेल्या आयसीसीसच्या प्रेमात पडलेल्या सहा तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली. चार तरुणांना मंगळवारी तर दोन जणांना आज बुधवारी ताब्यात एटीएसच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सिटीचौक, शहरागंज परिसरातून ताब्यात घेतले होते.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहरातील सिटीचौक परिसरातील रहिवासी असलेले चार जण आयसिसमध्ये जाण्याची शक्यता असून ते मोबाईल व इंटरनेटचा सतत वापर करतात, अशी माहिती खबऱ्याने एटीएसच्या अधिकाऱ्यांना दिली होती. ते फेसबुक आणि व्हॉट्सअप या सोशल मिडियाच्या माध्यमातून आयसिसच्या संपर्कात असल्याचे एटीएसला समजले होते. यानंतर एटीएस गेल्या काही दिवसापासून या तरुणांच्या हालचालीवर नजर ठेवून होते.दरम्यान मंगळवारी या तरुणांना एटीएसने एका कापड दुकानातून ताब्यात घेतले. या चौघांची कसून चौकशी केल्यानंतर या तरुणांचे समुपदेशन अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मंगळवारी चौघांचे समुपदेशन केल्यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आणखी दोन जणांना सिटीचौक परिसरातील एका कापड दुकानातून ताब्यात घेतले.ते ही आयसिसच्या प्रेमात असल्याची माहिती एटीएसला मिळाल होती. या दोन्ही तरुणांचीही रात्री उशीररापर्यंत चौकशी सुरू होती. या चौकशीत काय निष्पन्न झाले हे मात्र समजू शकले नाही.